ठरवून केलेल्या षड्यंत्रामुळे भारतीय प्रसारमाध्यमे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:13 AM2019-09-10T03:13:47+5:302019-09-10T03:13:54+5:30

पत्रकार रवीशकुमार; रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान

 Indian media in crisis because of conspiracy to determine | ठरवून केलेल्या षड्यंत्रामुळे भारतीय प्रसारमाध्यमे संकटात

ठरवून केलेल्या षड्यंत्रामुळे भारतीय प्रसारमाध्यमे संकटात

googlenewsNext

मनिला : भारतीय प्रसारमाध्यमे संकटात असून हे अपघाताने घडलेले नाही, तर ठरवून केलेले षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार रवीशकुमार यांनी येथे केले.

एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेले रवीशकुमार यांच्यासह म्यानमारचे को स्वे वीन, थायलंडच्या अंगखाना नीलापैजित, फिलिपाईन्सचे रेमुंडो पुजांते कायाब्याब, द. कोरियाचे किम जाँग की यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवीशकुमार म्हणाले की, भारतीय प्रसारमाध्यमे संकटात का आहेत याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. सर्वच लढाया जिंकण्यासाठीच केल्या जातात असे नाही. मनात नसतानाही लढा पुकारावा लागतो. युद्धभूमीवर कुणीतरी लढते हे इतरांच्या ध्यानी आणून देण्यासाठीही मैदानात उतरावे लागते. 

काहीजण सरकारची बाजू मांडण्यातच दंग
रवीशकुमार म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले. तिथे इंटरनेट सेवा अद्यापही बंद आहे. अशा वातावरणात काही प्रमुख वृत्तवाहिन्या फक्त सरकारची बाजू दाखविण्यातच समाधान मानताना दिसतात.

Web Title:  Indian media in crisis because of conspiracy to determine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.