शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 21:37 IST

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे.

Foreign Minister S. Jaishankar’s Interview : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. एका ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला परराष्ट्रमंत्र्यांनी ही मुलाखत दिली आहे. मुलाखतीत भारताच्यारशियाशी असलेल्या मैत्रीच्या प्रश्नावर एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारत-रशिया संबंधांबाबत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले जयशंकर...ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारताच्या रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांमध्ये काही अडचण आहे का? असा प्रश्न जयशंकर यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, आमच्या रशियासोबत असलेल्या मैत्रिचा ऑस्ट्रेलियाशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या काळात कोणत्याही देशाशी विशेष संबंध नाहीत. पाकिस्तानला टोला लगावत जयशंकर म्हणथात, तुमच्या तर्कानुसार विचार केला तर अनेक देशांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. अशा स्थितीत भारताने काळजी करण्याची गरज आहे का?

भारत-रशिया संबंधांचा जगाला फायदा जयशंकर पुढे म्हणाले की, भारताच्या रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला फायदा होत आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर जयशंकर म्हणतात, भारताने हे केले नसते, तर जागतिक ऊर्जा बाजार पूर्णपणे नष्ट झाला असता. जगात ऊर्जेचे संकट आले असते, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असत्या आणि जगभर महागाई शिगेला पोहोचली असती. भारताचे रशियासोबतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू करण्यास मदत करू शकतात.

भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. जगाला आणि अगदी ऑस्ट्रेलियालाही अशा देशाची गरज आहे, जो युद्धाला चर्चेच्या टेबलावर आणण्यास मदत करू शकेल. बहुतांश युद्धे वाटाघाटीच्या टेबलावर संपतात, अशी प्रतिक्रियाही जयशंकर यांनी दिली.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतrussiaरशियाAustraliaआॅस्ट्रेलिया