भारतीय वंशाचे मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात ?
By Admin | Updated: June 24, 2016 02:27 IST2016-06-24T02:26:12+5:302016-06-24T02:27:28+5:30
भारतीय वंशाचे १२ लाख मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात म्हणजेच ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या विरोधात मतदान करु शकतात.

भारतीय वंशाचे मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात ?
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले भारतीय वंशाचे १२ लाख मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात म्हणजेच ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या विरोधात मतदान करु शकतात. मतदानापूर्वी 'ब्रिटीश इलेक्शन'च्या सर्वेक्षणानुसार भारतीय वंशाच्या ५१.७ टक्के मतदारांनी ब्रेक्झिटच्या विरोधात मत नोंदवले.
२७ टक्के मतदार युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूचे होते. १६.८५ टक्के काय करायचे ते माहित नाही या वर्गातील होते.
ब्रिटनमध्ये रहाणा-या दक्षिण आशियाई देशाच्या नागरीकांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नागरीकांनीही ब्रेक्झिटच्या विरोधात मत नोंदवले.