भारतीय टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात झाली चोरी
By Admin | Updated: January 22, 2016 19:13 IST2016-01-22T19:13:14+5:302016-01-22T19:13:14+5:30
मेलबर्न येथे २००६ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टेबलटेनिसपटू दत्ता याने पटकावलेले गोल्ड मेडल घरातून चोरीला गेले आहे. मुनी पाँड्स परीसरात त्याचे घर असून १२ जानेवारी

भारतीय टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात झाली चोरी
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २२ - मेलबर्न येथे २००६ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टेबलटेनिसपटू दत्ता याने पटकावलेले गोल्ड मेडल घरातून चोरीला गेले आहे. मुनी पाँड्स परीसरात त्याचे घर असून १२ जानेवारी रोजी ही चोरी झाली.
भारतातल्या माझ्या मित्रांशी मी बोललो, त्यांनीही खेद व्यक्त केल्याचे दत्ताने म्हटले आहे. सुवर्णपदक जिंकणे हा अत्यानंदाचा भाग होता, पणते पदक चोरीला जाणे फार त्रासदायक असल्याचे त्याने म्हटले आहे. दत्ता आठव्या वर्षापासून टेबल टेनिस खेळतो, त्याचे प्रशिक्षक मेलबर्न येथील आहेत.
चोराला मी एवढंच सांगेन, की तू फक्त सोनं म्हणून ते चोरलंस, पण माझ्यासाठी त्याची किंमत खूप जास्त आहे, त्यामुळे तू मला ते परत दिलंस तर फार चांगलं होईल. माझ्यासाठी आणि माझ्या टीममधल्या सहका-यांच्या भावना त्या मेडलमध्ये असल्याचे त्याने म्हटले आहे.
या पदकाबरोबरच अन्य मौल्यवान गोष्टींचीही चोरी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे पोलीसही मेडलच्या चोरीमुळे चक्रावले असून त्यांचा तपास सुरू आहे.