भारतीय मुलीने ओबामांना सर्व्ह केला मसाला बर्गर

By Admin | Updated: July 16, 2015 03:53 IST2015-07-16T03:53:23+5:302015-07-16T03:53:23+5:30

९ वर्षांच्या श्रेया पटेल या भारतीय मुलीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना गरम मसाला बर्गर व रायता, अशी डिश सर्व्ह केली

Indian girl served the Obama Masala Burger | भारतीय मुलीने ओबामांना सर्व्ह केला मसाला बर्गर

भारतीय मुलीने ओबामांना सर्व्ह केला मसाला बर्गर

न्यूयॉर्क : ९ वर्षांच्या श्रेया पटेल या भारतीय मुलीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना गरम मसाला बर्गर व रायता, अशी डिश सर्व्ह केली आणि त्या बदल्यात अमेरिकेच्या पहिल्या दाम्पत्याबरोबर व्हाईट हाऊसमध्ये जेवण्याची संधी मिळवली.
स्पर्धेत ५५ कुक
इलिनॉईस प्रांतातील शामबर्ग येथे राहणाऱ्या श्रेया पटेलने ५५ लहान कुकस्बरोबर स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. किड्स स्टेट डिनर नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिचे व्हाईट हाऊसमध्ये लाल गालिचावरून शाही स्वागत करण्यात आले. लहान मुलांनाही पोषक आहाराचे महत्त्व कळावे म्हणून ही स्पर्धा घेतली जाते. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian girl served the Obama Masala Burger