भारतीय कर्मचार्‍याचे अफगाणमध्ये अपहरण

By Admin | Updated: June 3, 2014 00:16 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-03T00:16:24+5:30

अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात एका भारतीय कर्मचार्‍याचे सोमवारी अपहरण करण्यात आले.

Indian employee abducted in Afghan | भारतीय कर्मचार्‍याचे अफगाणमध्ये अपहरण

भारतीय कर्मचार्‍याचे अफगाणमध्ये अपहरण

काबूल : अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात एका भारतीय कर्मचार्‍याचे सोमवारी अपहरण करण्यात आले. याच राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय वकिलातीवर सशस्त्र लोकांनी हल्ला होता.
अपहरण करण्यात आलेला कर्मचारी मूळचा तामिळनाडूचा असून तो एका अशासकीय स्वयंसेवी संस्थेसाठी हेरातमध्ये काम करत होता. अज्ञात लोकांनी अज दुपारी त्याचे अपहरण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अपहरणाच्या वृत्तास दुजोरा दिला असून, याबाबत आपण स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian employee abducted in Afghan