भारतीय डॉक्टरने वाचवले मुलाचे प्राण
By Admin | Updated: September 28, 2015 23:43 IST2015-09-28T23:43:48+5:302015-09-28T23:43:48+5:30
विमानात दम्याने उचल खाल्ल्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकी डॉक्टरने एक कप व बाटलीच्या मदतीने इन्हेलर बनवून दोनवर्षीय बालकाचे प्राण वाचविले.

भारतीय डॉक्टरने वाचवले मुलाचे प्राण
न्यूयॉर्क : विमानात दम्याने उचल खाल्ल्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकी डॉक्टरने एक कप व बाटलीच्या मदतीने इन्हेलर बनवून दोनवर्षीय बालकाचे प्राण वाचविले.
न्यूयॉर्क येथील डॉ. खुर्शीद गुरू विमानाने स्पेनहून अमेरिकेला जात होते. तेव्हा त्यांना मुलाच्या प्रकृतीची माहिती कळाली. आईवडिलांनी चुकून इन्हेलर सामानात ठेवले होते. डॉ. गुरु यांनी प्लास्टिकची बॉटलपासून इन्हेलर तयार केले व त्याचे प्राण वाचविले. (वृत्तसंस्था)