लिबियातील भारतीय डॉक्टरची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 02:13 IST2017-02-22T02:12:14+5:302017-02-22T02:13:03+5:30
लिबियामध्ये अपहरण झालेल्या भारतीय डॉक्टरची सुटका करण्यात आली असून

लिबियातील भारतीय डॉक्टरची सुटका
ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 22 - लिबियामध्ये अपहरण झालेल्या भारतीय डॉक्टरची सुटका करण्यात आली असून, त्यांना लवकरच भारतात आणण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मूळचे डॉ.राममूर्ती कोसानाम यांचे १८ महिन्यांपूर्वी लिबियातील इसिसने अपहरण केले होते. त्यांची सुटका करताना झालेल्या गोळीबारात डॉ.कोसानाम यांना एक गोळी लागली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहा जणांचीही सुटका करण्यात आल्याचेही सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.