शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 15:31 IST

यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल.

ठळक मुद्देया चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते.लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. 'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले.

बिजिंग :भारत-चीनसीमा वाद सुरू असतानाच, लडाख सीमेवर चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत भारतील लष्कराच्या एका अधिकाऱ्याला आणि दोन जवानांना हौतात्म्य आले. या चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते. चीननेही ही घटना अत्यंत गांभिर्याने घेतली आहे. यासंदर्भात चीनीच्या पराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, या संपूर्ण प्रकरणावर चीन गंभीर आहे. आम्ही भारताला आवाहन करतो, की त्यांनी एकतर्फी कारवाई सारखे पाऊल उचलू नये आणि हे प्रकरण अधिक वाढवू नये.

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

रॉयटर्स या वृत्त संस्थेने म्हटले आहे, की लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की  'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले. यात आपले जवान शहीद झाले. यात एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा समावेश आहे.

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

भारतावरच केला आरोप -एकीकडे भारताला एकतर्फी पाऊल उचलू नये, असे आवाहन करणारा चीन दुसरीकडे भारतीय लष्करच या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचे म्हणत आहे. चीनने सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सच्या माध्यमाने भारतावर सीमा ओलांडून कराराचे उल्लंघण केल्याचा आरोप केला आहे. चीनने आरोप केला आहे, की भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा हिंसाचार झाला. एवढेच नाही, तर भारताने आपल्या लष्कराला करारानुसार सीमा ओलांडण्यापासून रोखायला हवे. यामुळे अशा प्रकारची चकमक पुन्हा उद्भवणार नाही, असे आवाहनही चीनने केले आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

...तर चीनचंच मोठं नुकसान -भारत आणि चीन यांच्यात यापूर्वी 1967 मध्ये झाडप झाली होती. म्हणजे बरोबर 53 वर्षांपूर्वी. ही चकमक सिक्किममध्ये उडाली होती. भारत आपल्या हद्दीत 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. यामुळे चीन चिडला होता. 1967च्या या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते.

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषा