भारतीय राजदूत हल्ल्यातून बचावले!

By Admin | Updated: May 15, 2015 05:04 IST2015-05-15T05:04:35+5:302015-05-15T05:04:35+5:30

भारताचे अफगाणमधील राजदूत अमर सिन्हा यांना लक्ष्य ठेवून तालिबान्यांनी येथील पार्क पॅलेस गेस्ट हाऊसवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४ भारतीय

Indian ambassador escaped from attack! | भारतीय राजदूत हल्ल्यातून बचावले!

भारतीय राजदूत हल्ल्यातून बचावले!

काबूल : भारताचे अफगाणमधील राजदूत अमर सिन्हा यांना लक्ष्य ठेवून तालिबान्यांनी येथील पार्क पॅलेस गेस्ट हाऊसवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४ भारतीय व एका अमेरिकन नागरिकासह १४ जण मारले गेले. याच गेस्ट हाऊसमधील कार्यक्रमास सिन्हा यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण ते कार्यक्रमाला गेलेच नाहीत, त्यामुळे बचावले.
बुधवारी रात्री तालिबान्यांनी बेछूट गोळीबार करीत गेस्ट हाऊसवर हल्ला चढविल्यानंतर तेथे वेढा घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सात तासांच्या झुंजीनंतर तीनही हल्लेखोरांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलाने ५४ लोकांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच दहशतवाद्यांनी मुस्लीम धर्मगुरुंच्या बैठकीवर हेलमंद येथे केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले. या झालेल्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य भारतीय राजदूत होते, याला वरीष्ठ अफगाण अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

Web Title: Indian ambassador escaped from attack!