शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 08:49 IST

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिल्यानंतर तिथल्या पोलीस दलाने गंभीर आरोप केले आहेत.

India vs Canada : भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने तातडीने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅनडाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा असल्याचं भारताने म्हटलं. आता कॅनडातील पोलिसांनी गंभीर आरोप केला आहे.

भारताच्या कारवाईने हताश झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता भारतावर आरोप करत आहेत. भारताने कॅनडाच्या नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया करू शकतात असा विचार करून चूक केल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहेत. यासोबतच भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पत्रकार परिषदेत केला आहे. कॅनडातील भारतीय गुप्तहेर खलिस्तान समर्थकांना  लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत, असे कॅनडा पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र याबाबत त्यांनी याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. 

भारताने सोमवारी आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकारी यांना परत बोलावण्याची घोषणा केली. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केलं जात असल्याने त्यांना परत मायदेशी बोलावले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांना १९ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्यास सांगितले आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने संजय वर्मा यांचा उल्लेख केल्याने भारताने ही कारवाई केली आहे.

भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ओटावा येथे पत्रकार परिषदेत घेत भारताला इशारा दिला. ट्रूडो यांनी भारत सरकारवर कॅनडातील गुन्हेगारी कारवायांचे समर्थन करून चूक केल्याचा आरोप केला. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाबाबत बोलताना ट्रुडो यांनी सिंगापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आगामी बैठकीच्या महत्त्वावर भर दिला. "गेल्या आठवड्याच्या शेवटी जेव्हा मी पंतप्रधान मोदींशी बोललो तेव्हा मी  सिंगापूरमध्ये आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधली बैठक किती महत्त्वाची असेल हे त्यांना सांगितले. त्यांना त्या बैठकीची माहिती होती आणि मी त्यांना सांगितले की ही बैठक अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे," असं ट्रुडो म्हणाले.

दुसरीकडे, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला की भारत सरकारचे गुप्तहेर कॅनडाच्या भूमीवर दहशत पसरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत. "आपण पाहिले आहे की संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर केला जात आहे आणि एक टोळी यासाठी जबाबदार आहे. बिश्नोई टोळीचे भारतातील गुप्तहेरांशी संबंध आहेत," असे पोलिसांनी म्हटलं आहे. ३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा मुंबई पोलिसांना संशय असताना कॅनडाच्या पोलिसांनी हे आरोप केले आहेत. 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतJustin Trudeauजस्टीन ट्रुडो