भारत जगातील सर्वाधिक तरुण देश
By Admin | Updated: November 18, 2014 23:20 IST2014-11-18T23:20:41+5:302014-11-18T23:20:41+5:30
भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. मात्र, एकू ण लोकसंख्येबाबत भारत, चीनच्या मागे आहे.

भारत जगातील सर्वाधिक तरुण देश
संयुक्त राष्ट्र : भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. मात्र, एकू ण लोकसंख्येबाबत भारत, चीनच्या मागे आहे. भारतात १० ते २४ वयोगटातील ३५.६ कोटी लोकसंख्येसह भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश ठरला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने यासंदर्भातील एक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. चीन २६.९ कोटी तरुण लोकसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय म्हणजे पहिल्या तीन क्रमांकावर आशियाई देश आहेत.
अहवालानुसार, भारत आणि चीन यांच्यानंतर इंडोनेशिया (६.७ कोटी), अमेरिका (६.५ कोटी), पाकिस्तान (५.९ कोटी), नायजेरिया (५.७ कोटी), ब्राझील (५.१ कोटी) व बांगलादेश (४.८ कोटी) यांचे स्थान आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या लोकसंख्या निधीच्या अहवालात आकडेवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विकनशील देशांत मोठ्या प्रमाणावर तरुण लोकसंख्या आहे. (वृत्तसंस्था)