भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान
By Admin | Updated: September 26, 2016 13:42 IST2016-09-26T13:42:37+5:302016-09-26T13:42:37+5:30
भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल.

भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २६ - भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल. आमची भारताबरोबर युद्ध करण्याची इच्छा नाही आणि या टप्प्यावर युद्ध पुकारले तर, भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल याची भारताला पूर्णपणे कल्पना आहे असे पाकिस्तानी डिप्लोमॅटसना वाटते.
डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने कोणाचेही नाव न छापता पाकिस्तानी डिप्लोमॅटसच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. संपूर्ण जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. भारताची ती एक कल्पनाच राहील उलट भारतच एकाकी पडले असे या डिप्लोमॅटसचे म्हणणे आहे.
आम्ही आमच्या १८ जवानांचे बलिदान विसरणार नाही. सैन्य न बोलता आपला पराक्रम दाखवेल या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचक इशा-यानंतर पाकिस्तानातील अस्वस्थतता अधिकच वाढली आहे. भारताला युद्धाच्या परिणामांचे ग्यान सांगणा-या पाकिस्तानच्या नुसत्या युद्ध सरावाने त्यांचा शेअर बाजार कोसळला याचा मात्र या डिप्लोमॅटसना विसर पडला.