शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'तेल का खेल' भारताला महागात पडेल; इराणचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 18:47 IST

तेल आयातीवरून इराणनं भारताला गंभीर इशारा दिला आहे...

तेहरान- गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इतर देशांनी तेल आयात करू नये, त्यासाठी अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे भारतही इराणकडून तेल आयातीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. परंतु आता तेल आयातीवरून इराणनं भारताला गंभीर इशारा दिला आहे. सामरिकदृष्ट्या चाबदार बंदर हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक भारतानं कमी केल्यास त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार असल्याचं इराणनं म्हटलं आहे.भारतानं चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक कमी केली आणि आमच्याकडून घेण्यात येणा-या तेल आयातीत भारतानं कपात केल्यास त्यांना दिलेले विशेष अधिकार काढून घेऊ, अशी धमकीही इराणनं भारताला दिली आहे. इराणचे उपराजदूत मसूद रेजवानियन राहागी म्हणाले, जर भारतानं इराणकडून तेल आयात कमी करून सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दिलेले विशेषाधिकार काढून घेऊ. ग्लोबल डिप्लोमसीतील आव्हानं आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव या कार्यक्रमात राहागी बोलत होते. भारतानं चाबहार बंदर विकास आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेनं अद्यापही योग्य पावलं टाकलेली नाहीत. चाबहार बंदरावरून भारत धोरणात्मक भागीदारी करू इच्छित असल्यास त्यांनी तात्काळ त्यावर लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारताला दिला आहे.चाबहार बंदर हे भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. अशातच इराणकडून भारताला असा इशारा देण्यात आल्यानं भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारतासाठीही चाबहार बंदर महत्त्वाचं आहे. कारण पाकिस्ताननं स्वतःच्या भागातून भारताला पश्चिम आणि मध्य आशियात व्यापार करण्यास बंदी केली आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे.चाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणाऱ्या तेल आयातीत अडथळा येणार नाही.

टॅग्स :IranइराणIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय