शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan: भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, अण्वस्त्र शक्तीही जाईल; इम्रान खान यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 10:00 IST

पंतप्रधान पदावरून हाकलल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात एका मागोमाग एक सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना दुबईवरून नवे कोरे हेलिकॉप्टर देण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर कोणी दिले हे त्यांनी सांगितलेले नाही. 

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात पुन्हा वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. जर पाकिस्तानी सैन्याने योग्य निर्णय घेतला नाही तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, असा इशारा दिला आहे. भारतीय थिंक टँक वेगवेगळे कट रचत आहे, म्हणून मी हे बोलत असल्याचे इम्रान खान म्हणाले. 

पंतप्रधान पदावरून हाकलल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात एका मागोमाग एक सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना दुबईवरून नवे कोरे हेलिकॉप्टर देण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर कोणी दिले हे त्यांनी सांगितलेले नाही. 

पाकिस्तान आत्महत्या करण्याच्या वाटेवर आहे, जर योग्य निर्णय घेतले नाही तर पहिली शिकार सैन्य असेल आणि आपली युक्रेनसारखीच अण्वस्त्रे जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इम्रान खान यांनी  एका चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत. पाकिस्तानवर दिवाळखोर होण्याचे संकट आहे. ही पाकिस्तान आणि सैन्याची खरी समस्या आहे. तुम्हाला मी लिहून देतो, पाकिस्तानी सैन्य संपून जाईल. जेव्हा देश बर्बाद होईल तेव्हा जग सांगेल की अण्वस्त्रांचा त्याग करा, जसे १९९० मध्ये युक्रेनमध्ये झालेले, असेही ते म्हणाले. 

परदेशातील भारतीय थिंक टँक स्वतंत्र बलुचिस्तान देश निर्माण करण्यासाठी तयारी करत आहे. त्यांच्या तशा योजनाच आहेत, यामुळे मी दबाव आणत आहे, असे इम्रान खान म्हणाले. शाहबाज शरीफ हे अमेरिकेला खूश करण्यासाठी काहीही करतील, असा आरोपही इम्रान खान यांनी केला. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारत