वॉशिंग्टन: भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार करार पूर्ण न होण्यामागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नाही, त्यामुळेच हा करार अंतिम टप्प्यात पोहोचू शकला नाही. एका पॉडकास्ट मुलाखतीत लुटनिक यांनी हा खुलासा केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हॉवर्ड लुटनिक यांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा मसुदा त्यांनी स्वतः तयार केला होता. दोन्ही देश कराराच्या खूप जवळ होते. मात्र, अशा मोठ्या करारांसाठी दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमधील थेट संवाद आवश्यक असतो. लुटनिक म्हणाले, "मी करार तयार केला होता, पण त्यासाठी मोदींनी ट्रम्प यांना फोन करणे गरजेचे होते. भारतीय बाजू या संवादासाठी फारशी उत्सुक नव्हती आणि मोदींनी फोन केला नाही. परिणामी, तो करार तिथेच थांबला."
अमेरिका मागे हटली?लुटनिक यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ज्या अटींवर यापूर्वी चर्चा झाली होती, त्या आता कालबाह्य झाल्या आहेत. भारताने काही दिवसांनंतर पुन्हा संपर्क साधला, तेव्हा लुटनिक यांनी स्पष्ट सांगितले की, "ती ट्रेन आता स्टेशन सोडून गेली आहे." याचा अर्थ असा की, अमेरिका आता त्या जुन्या अटींवर करार करण्यास तयार नाही.
भारत-अमेरिका संबंधांतील तणावाचे कारणट्रम्प प्रशासनाने भारतावर ५००% टॅरिफ (कर) लादण्याची तयारी सुरु केली आहे. विशेषतः भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याने आणि चीनसोबतच्या काही धोरणांमुळे अमेरिका नाराज असल्याचे बोलले जाते. लुटनिक यांनी यापूर्वीही भारताला 'टॅरिफ किंग' म्हणून संबोधले होते आणि बाजारपेठा खुल्या करण्याची मागणी केली होती.
Web Summary : A US official claims a trade deal failed because Modi didn't call Trump. Previous terms are now outdated, and the US is seemingly unhappy with India's oil and trade policies.
Web Summary : एक अमेरिकी अधिकारी का दावा है कि व्यापार समझौता इसलिए विफल रहा क्योंकि मोदी ने ट्रम्प को फोन नहीं किया। पुराने नियम अब पुराने हैं, और अमेरिका भारत की तेल और व्यापार नीतियों से नाखुश है।