शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

“देशांतर्गत संरचना मजबूत करा, कट्टरतावाद वाढू देऊ नका”; भारताने दाखवला कॅनडाला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 13:01 IST

Canada-India Crisis: भारताच्या भूमिकेला समर्थन देत बांगलादेश आणि श्रीलंकेनेही कॅनडाला अनेक सल्ले दिले आहेत.

Canada-India Crisis: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भाजपवर आरोप केले. याला संयुक्त राष्ट्र संघात प्रत्युत्तर देताना चांगलाच आरसा दाखवल्याचे सांगितले जात आहे. 

आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे अप्रत्यक्षरित्या ट्रुडो यांनी भारताला सुनावले होते. यावर संयुक्त राष्ट्र संघात प्रत्युत्तर दिले.

द्वेषयुक्त भाषणे रोखण्यासाठी कायदे मजबूत केले पाहिजेत

युनायटेड राष्ट्रात मुसद्दी मोहम्मद हुसेन म्हणाले, भारताचा कॅनडाला सल्ला आहे की देशांतर्गत संरचना मजबूत करावी, जेणेकरून भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये. त्याचबरोबर कट्टरतावादाला चालना देऊ नये आणि हिंसाचार भडकावू नये. कॅनडातील धार्मिक अल्पसंख्याक आणि धार्मिक स्थळांवर होणारे हल्लेही थांबले पाहिजेत. द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणे रोखण्यासाठी कायदे मजबूत केले पाहिजेत, असे सांगत कॅनडाला आरसा दाखवला. 

दरम्यान, भारतासह बांगलादेशनेही कॅनडाला सूचना केल्या आहेत. वर्णभेद, द्वेषपूर्ण गुन्हे आणि स्थलांतरित आणि मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव रोखण्यासाठी कॅनडाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवायला हवे, असे बांगलादेशच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेचे राजदूत थिलिनी जयसेकरा यांनी कॅनडाच्या अधिकार्‍यांना सांगितले की, स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे संरक्षण केले पाहिजे. वर्णभेद आणि भेदभाव करणाऱ्या धोरणांना विरोध करण्याची आणि स्थलांतरित कामगारांच्या हक्कांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचीही गरज आहे.

 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ