India attacks Lahore Pakistan: पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता भारतानेपाकिस्तानमधील लोहारवर ड्रोन हल्ला केल्याचे वृत्त समजले आहे. पाकिस्तानने आज संध्याकाळनंतर जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक भागात ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने योग्य उत्तर दिले. त्यानंतर भारताने प्रतिहल्ला करत लाहोरमध्ये ड्रोन हल्ले केले.
भारताकडून पाकिस्तानवर प्रतिहल्ला
भारताने काउंटर ड्रोन सिस्टीम, S-400 वापरून पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे पाडली. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडली. भारताने पाकिस्तानचे २ जेएफ १७ आणि एक एफ-१६ विमान पाडले. हे पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी ती विमाने पाडण्यात आली. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून लाहोरमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.
ब्लॅकआऊटनंतर जम्मूमध्ये वीजपुरवठा पूर्ववत
सध्या जम्मूमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. त्याच वेळी, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तर कारवाईदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांशी सतत संपर्कात आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, "मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तणाव त्वरित कमी करण्याची गरज व्यक्त केली."