शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 08:44 IST

संयुक्त राष्ट्रच्या सभेत पाकिस्ताननं भारतावर आरोप केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं.

नवी दिल्ली - देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. या देशाने त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात परंतु काही देश जाणुनबुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम खूप भयानक असतात अशा शब्दात एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

संयुक्त राष्ट्रे आमसभेत एस जयशंकर बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, आमच्या शेजारील पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे. पाकिस्तान नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो, तीच स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्याच समाजाचे नुकसान करत आहेत. ते जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचे फळ आहे असं त्यांनी खडसावून सांगितले.

तसेच दुर्दैवाने त्यांच्या गैरकृत्यांचा इतरांवर परिणाम होतो, विशेषत: शेजाऱ्यांवर..जेव्हा राजकारणात आपल्या लोकांमध्ये कट्टरता असते तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरपंथ आणि दहशतवादाच्या रुपात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जमिनीच्या लालसेपोटी कृत्य करणाऱ्या एका निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश आणि सामना केला पाहिजे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं.

दरम्यान, जयशंकर यांनी पाकिस्तानला यासाठी सुनावले कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील स्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या कृत्याचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. पाकिस्तानद्वारे अवैधरित्या कब्जा करण्यात आलेलं भारतीय क्षेत्र(POK) रिकामा करून देणे हे आमच्यातील समस्येवर तोडगा आहे असंही भारताने सांगितले.

पाकिस्ताननं काय म्हटलं होतं?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी यूएनजीएच्या सभेत त्यांच्या भाषणात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. ते म्हणाले होते की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मीरी लोकांची इच्छा यावर चर्चा होण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला. भारताने परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे. भारतीय नेतृत्वाने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादPOK - pak occupied kashmirपीओके