शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

India-Russia talks : रशियाची भारताला स्पेशल ऑफर! युद्ध काळातच लावरोव्ह यांनी दिला खास प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 20:37 IST

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी रात्री उशिरा चीनवरून दिल्लीत आले.

नवी दिल्ली - भारतात तेलाचा पुरवठा वाढविण्यासाठी रशियाने आता एक खास ऑफर दिली आली आहे. युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी असलेल्या तेलाच्या दरावर प्रति बॅरल 35 डॉलर एवढी सूट देण्याचा प्रस्ताव रशियानेभारतासमोर ठेवला आहे. नुकतेच दिल्लीत आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Sergei Lavrov) यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं भारताचं कौतुक -रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी रात्री उशिरा चीनवरून दिल्लीत आले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान लॅवरोव्ह म्हणाले, "भारत या संपूर्ण परिस्थितीकडे एकतर्फी न पाहता वस्तुस्थितीनुसार पाहत आहे, आम्ही याचे कौतुक करतो."

रुपये-रूबलवर सुरू आहे काम - युद्धामुळे युक्रेनकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर, भारताने रशियाकडून विक्रमी दराने सूर्यफूल तेल खरेदी करण्याचा करार केला आहे. वृत्तानुसार, भारत आणि रशिया व्यापार सुलभ करण्यासाठी आणि रशियन बँकांवरील पाश्चात्य निर्बंध दूर करण्यासाठी रुपया-रुबल यंत्रणेवरही दोन्ही देश काम करत आहेत. 

या शिवाय, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे, की आम्ही भारताला कुठल्याही प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यास तयार आहोत. भारताला जे आमच्याकडून खरेदी करायचे असेल ते आम्ही देऊ. आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत. रशिया आणि भारतात(India-Russia) खूप चांगले संबंध आहेत. भारत-रशियाच्या भागीदारीवर कुठल्याही दबावाचा काही परिणाम होईल, अशी शंकाही माझ्या मनात नाही. दुसऱ्यांना त्यांच्या धोरणांवर काम करण्यासाठी मजबूर केले जात आहे, असे म्हणत त्यांनी अमेरिकेवरही नाव न न घेता निशाणा साधला. अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिन