शहरं
Join us  
Trending Stories
1
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
2
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
4
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
5
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
6
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
7
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
8
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
9
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
10
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
11
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
12
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
13
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
14
'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
15
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
16
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
17
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
18
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
19
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
20
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:34 IST

India-Russia Submarine Deal: रशिया पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक यासेन-क्लास न्यूक्लियर अटॅक सबमरीनचे तंत्रज्ञान भारतला देण्यास तयार झाला आहे.

India-Russia Submarine Deal: भारत आणि रशिया यांच्यात अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांबाबत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता नवीन वळण  मिळाले आहे. ताज्या अहवालांनुसार, रशिया आपली जगप्रसिद्ध Yasen-Class न्यूक्लियर सबमरीन भारताला देण्यास तयार असून, त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण स्टेल्थ, सेन्सर व शस्त्र प्रणाली तंत्रज्ञानदेखील देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. हा करार प्रत्यक्षात आला, तर भारतीय नौदलासाठी हे खूप फायदेशीर ठरणार नाही.

अहवालांनुसार रशिया ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी तयार असल्याचे सांगितले जाते, त्यात उच्चस्तरीय स्टेल्थ स्ट्रक्चर, आधुनिक सेन्सर नेटवर्क आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे एकीकरण तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

यासेन-क्लास ही जगातील अत्यंत शांत आणि बहुउद्देशीय क्षमतांनी सज्ज असलेल्या पाणबुड्यांपैकी एक मानली जाते. खोल समुद्रात वेगाने प्रवास करण्याची क्षमता, तसेच दीर्घ पल्ल्याच्या विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणामुळे रशियन नौदल तिला आपली सर्वात प्रभावी पाणबुडी मानते. भारताला हे तंत्रज्ञान मिळाले, तर भविष्यात भारतीय नौदलाची ताकद नक्कीच वाढणार आहे.

भारताचा Project-77 SSN 

भारत सध्या Project-77 SSN या महत्वकांशी प्रकल्पावर काम करत आहे. या अंतर्गत आठ आधुनिक अणू पाणबुड्या तयार करत आहे. दोन पनडुब्ब्या जवळपास तयार अवस्थेत, तर उर्वरित पाणबुड्यांचे काम अपेक्षित गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ₹1.2 लाख कोटी आहे. विशेष म्हणजे, याचे डिझाईन पूर्णपणे भारतीय आहे.  जर रशियन तंत्रज्ञानाची याला मदत मिळाली, तर याची क्षमता अनेक पटींनी वाढेल आणि भारताचा SSN कार्यक्रम जगातील सर्वात सक्षम प्रकल्पांपैकी एक ठरेल.

Yasen-Class; काय आहे खासियत?

लांबी: सुमारे 139 मीटर

शांत आणि स्टेल्थ-ऑप्टिमाइझ्ड डिझाईन

दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता

हायपरसोनिक Zircon

अँटी-शिप Oniks

लँड-अटॅक Kalibr

दहा टॉरपीडो ट्यूब, जड वजनाचे टॉरपीडो वाहून नेण्याची क्षमता

ही वैशिष्ट्ये तिला जगातील अत्याधुनिक अणु पनडुब्बी श्रेणीत स्थान देतात.

भारताची समुद्री शक्ती वाढेल

जर यासेन-क्लासशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण खरोखरच आकार घेत असेल, तर भारतीय नौदलाची पाणबुडी क्षमता नव्या उंचीवर पोहोचू शकते. यामुळे भारत अत्याधुनिक अणु-पनडुब्ब्या तयार करण्यात स्वयंपूर्ण होईल आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा सामरिक प्रभाव आणखी मजबूत होईल. 

पाकिस्तानची पाणबुडी क्षमता

जिथे भारत SSN सारख्या उच्च दर्जाच्या अणु-पाणबुड्यांकडे वाटचाल करत आहे, तिथे पाकिस्तानची क्षमता अद्याप डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर आधारित आहे. NTI (Nuclear Threat Initiative) च्या माहितीनुसार पाकिस्तानकडे Agosta मालिकेतील काही AIP सबमरीन आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India to Get Nuclear Submarine from Russia, Navy to Strengthen

Web Summary : India and Russia are nearing a deal for a Yasen-Class nuclear submarine, enhancing Indian naval power. The agreement includes advanced stealth, sensors, and weaponry technology. This boosts India's submarine capabilities and supports its Project-77 SSN, strengthening its strategic influence in the Indian Ocean.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतindian navyभारतीय नौदलNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन