पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारत जबाबदार - हाफिज सईद
By Admin | Updated: December 17, 2014 21:39 IST2014-12-17T21:39:49+5:302014-12-17T21:39:49+5:30
पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे.

पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारत जबाबदार - हाफिज सईद
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे.
पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समस्त भारतीयांचे मन सुन्न झाले असतानाच तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील बळी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटे स्तब्ध राहण्याची सूचना केलेली असतानाच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरूध्द गरळ ओकली आहे. या हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप करून सईद म्हणाला की, या हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायला पाहिजे. एका सभेत त्याने हा आरोप केला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अश्रू सुध्दा खोटे असल्याचे सईद म्हणाला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने याआधीच घेतली आहे. या हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.