शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 08:06 IST

भारत 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी करत असल्याचा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

ठळक मुद्देभारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावाचीनवरील लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीतीभारताकडून 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी सुरू असल्याचा दावा

इस्लामाबाद: चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. मात्र पाकिस्तानला वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश नुकतेच दिले. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'जियो पाकिस्तान' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 'चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' असं कुरेशी म्हणाले.भारत पाकिस्तानविरोधात फॉल्स फ्लॅश ऑपरेशन (कारवाई करणाऱ्या देशाची ओळख गुप्त राहील अशा प्रकारची मोहीम) करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा दिला नाही. 'गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड जातं आहे,' असं कुरेशी पुढे म्हणाले.पाकिस्तानवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 'नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट भारताकडूनच त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं असून त्यांनाही तशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे,' असं कुरेशी म्हणाले.चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत