शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:58 IST

India Pakistan War: शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानचे शस्त्रसंधीचे फोन आल्याने स्थगित करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले चढविले होते. परंतू, पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरु केल्याने ते थोपवत भारताने पाकिस्तानचे एअरबेसच उध्वस्त केले होते. यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्यासाठी भारताला दोनवेळा फोन केले होते. हे वास्तव असताना पाकिस्तानी पंतप्रधान तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भारतानेच शस्त्रसंधीसाठी फोन केल्याची शेखी मिरवत आहेत. 

शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान आणि अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह इतर उपस्थित होते. तेव्हा शाहबाज भाषण देण्यासाठी उठले. तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांची ओळख करून देण्यासाठी त्यांना उभे राहण्यास सांगितले. यावेळी शाहबाज यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरवेळी काय घडले, ते खोटेनाटे रंगवून सांगितले. 

९ आणि १० मे च्या रात्री आम्ही भारताला योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे ४.३० वाजता फजरच्या नमाजानंतर मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्य अतिशय सक्षमपणे हल्ला करेल, असा तो निर्णय होता. परंतू नमाजानंतर पाकिस्तानी सैन्याने हल्ला करण्यापूर्वीच भारताने हल्ला केला. भारताने पुन्हा ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अनेक राज्यांमध्ये हल्ला केला. यामध्ये रावळपिंडी विमानतळ आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. आमचे फील्ड मार्शल जे पहिल्या रांगेत बसले आहेत, मुनीर जरा उभे रहा, तुमची ओळख करून देतो, असे शाहबाज म्हणाले. 

यानंतर शाहबाज यांनी मुनीर यांचे गुण गायले. यावर तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी टाळ्या वाजविल्या. शाहबाज म्हणाले की, मुनीर यांनी मला तेव्हा फोन केला आणि भारताच्या हल्ल्याबाबत सांगितले. सकाळी ९ वाजता परत फोन केला आणि भारताने शस्त्रसंधीसाठी विचारले असल्याचे म्हटले. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते, त्यांनी आमच्या नागरी वस्तीवर हल्ले केले, हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक असल्याचे शाहबाज म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान