India-Pakistan Tension:भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने गुरुवारी(8 मे) रात्री अचानक भारतातील लष्करी तळांसह रहिवासी भागांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय सैन्यानेही हे लल्ले तितक्याच ताकदीने परतून लावले. दरम्यान, पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याने त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी तर आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
ब्रिटिश वाहिनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विक्रम दोराईस्वामी यांनी मोठे फोटो दाखवले आणि म्हणाले की, पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांच्या मागे उभा नाही, तर त्यांना आश्रय आणि राज्य सन्मानदेखील देतो. त्यांनी दाखवलेल्या फोटोत पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी दहशतवादी हाफिज अब्दुल रौफच्या मागे उभे असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने घोषित केलेला दहशतवादी रौफ, हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मारलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी उपस्थित राहिले. फोटोत शवपेट्यांवर पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वजही गुंडाळल्याचे दिसत आहे. म्हणजेच, या दहशतवाद्यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी केला जातोय. दोराईसामी म्हणाले की, हा फोटो म्हणजे, पाकिस्तानची लष्करी यंत्रणा स्वतः दहशतवादाला संरक्षण देते असल्याचा पुरावा आहे.
विनय क्वात्रा यांनीही पाकिस्तानचा पर्दाफाश केलादरम्यान, अमेरिकन माध्यमांशी बोलताना अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादाविरुद्ध भारताची कारवाई 100 टक्के योग्य आणि न्याय्य असल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांच्या मुला आणि पत्नींसमोर मारले. आमची कारवाई दहशतवादाविरुद्ध होती, ती मानवताविरोधी कृत्याला थेट प्रत्युत्तर होती. त्यांनी यावर भर दिला की, भारत दहशतवादाविरुद्ध लढत आहे आणि हा केवळ भारताचाच नाही, तर संपूर्ण जगाचा मुद्दा असला पाहिजे.