शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:44 IST

India-Pakistan : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तान सातत्याने भारतावर निराधार आरोप करत सुटला आहे.

India-Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. याविरोधात पाकिस्तान सातत्याने बोंब मारत असून, विविध देशांकडे मदत मागत आहेत. अशातच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी थेट गाझा संकटाची तुलना सिंधू पाणी करारासोबत केली. 

वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, ताजिकिस्तानमध्ये बोलताना शहबाज शरीफ यांनी गाझा संकटाचा उल्लेख केला आणि म्हटले की, आज जग गाझामध्ये पारंपारिक शस्त्रांच्या वापरामुळे झालेल्या जखमा पाहत आहे. ते पुरेसे नव्हते की, आता आपण पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर झाल्याचे पाहत आहोत.भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. परंतु पाकिस्तान भारताला सिंधू पाणी करारावरील लाल रेषा ओलांडू देणार नाही. 

अझरबैजानमध्ये भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यात जखमी झाल्याची कबुली देणारे शाहबाज शरीफ सध्या ताजिकिस्तानमध्ये आहेत. 29 ते 31 मे दरम्यान ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे हिमनदी संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. शहबाज शरीफ यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या मुद्द्याला त्यांच्या देशाच्या दहशतवाद-प्रायोजित परराष्ट्र धोरणाशी जोडले आहे. परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान शाहबाज म्हणाले, सिंधू खोऱ्यातील पाण्याच्या वाटपाचे नियमन करणारा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, संकुचित राजकीय फायद्यासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवू नये. पाकिस्तान हे होऊ देणार नाही. विशेष म्हणजे, शहबाज यांनी या कार्यक्रमात पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चकार शब्द काढला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान शरीफ आणि त्यांचे शिष्टमंडळ, ज्यामध्ये लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचाही समावेश होता, त्यांनी तुर्की, इराण आणि अझरबैजानचा दौरा केला होता. येथेही शाहबाज यांनी दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर एक शब्दही न काढता फक्त भारतावर निराधार आरोप केले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत