भारत - पाकची 'दोस्ती' सीमा रेषेपर्यंतच
By Admin | Updated: January 7, 2015 16:22 IST2015-01-07T16:08:28+5:302015-01-07T16:22:03+5:30
दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान पर्यटन विभागाने घेतला आहे.

भारत - पाकची 'दोस्ती' सीमा रेषेपर्यंतच
ऑनलाइन लोकमत
लाहोर,दि. ७ - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय पाक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील प्रवाशांना त्रास होणार असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचे पाकच्या पर्यटन विभागाने म्हटले आहे.
१६ मार्च १९९९ मध्ये भारत - पाकमधील संबंध सुधारण्यासाठी दिल्ली - लाहोर दरम्यान दोस्ती बस सुरु करण्यात आली होती. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. यात भर म्हणजे पाकमध्ये दहशतवादी कारवायादेखील वाढल्या आहेत. पेशावर हल्ल्यानंतर पाक सरकारने सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर - दिल्ली दरम्यान धावणा-या बससेवेवर दहशतवादी हल्ल्याचे इशारे दिले जात आहे. यामुळे पाक सरकारने ही बस वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकमधून दिल्लीला येणारी आणि दिल्लीहून पाकला जाणारी बस वाघा सीमेपर्यंतच धावेल.