भारत- पाक करणार व्यापार उदारीकरणावर चर्चा
By Admin | Updated: June 30, 2014 22:28 IST2014-06-30T22:28:47+5:302014-06-30T22:28:47+5:30
वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारमण पुढील महिन्यात प्रथमच पाकिस्तानचे वाणिज्यमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांच्याशी चर्चा करणार आहेत.

भारत- पाक करणार व्यापार उदारीकरणावर चर्चा
>इस्लामाबाद : वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारमण पुढील महिन्यात प्रथमच पाकिस्तानचे वाणिज्यमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत द्विपक्षीय व्यापाराच्या उदारीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी नवीन रूपरेषा निश्चित केली जाईल.
उभय नेत्यांमध्ये भूतानमध्ये 24 जुलै रोजी साफ्ता मंत्रीस्तरीय परिषदेदरम्यान ही भेट होईल. द्विपक्षीय व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी भारताच्या वाणिज्यमंत्र्यांशी बातचीत करणार असल्याचे खान यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रलयाच्या एका अधिका:याने सांगितले की, उभय नेत्यांच्या बैठकीत व्यापार उदारीकरणाचा मुद्दा अजेंडय़ावर राहणार आहे.
पाकिस्तानने राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असलेला अधिक अनुकूल देश अर्थात एमएफएनऐवजी भारताला भेदभावरहित व्यापार पोहोच हा दर्जा दिला आहे. याशिवाय पाकिस्तान संवेदशीलता यादीत कपात करणो, व्हिसा नियम शिथिल करणो, बँकिंग आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी यांना परवानगी देण्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करणार आहे. (वृत्तसंस्था)
4व्यापारी संबंधातील सर्व अडथळे दूर करण्याची 31 डिसेंबर 2क्12 ही पहिली मुदत संपली आहे. आता दोन्ही देशांनी नव्या रूपरेषेवर सहमती बनविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे ते म्हणाले.
4भारताने नि:शुल्क अडथळ्यांबाबत पाकिस्तानच्या व्यापा:यांच्या चिंता दूर केल्या पाहिजेत.
4दोन्ही मंत्री व्यापार सुलभीकरणावर 2क्12 मध्ये करण्यात आलेल्या करारावरही विचारविनिमय करतील, अशी माहिती या अधिका:याने दिली.
4भारत- पाकिस्तान यांच्यातील व्यापारी संबंधात काश्मीर प्रश्नाचा मोठा अडथळा असल्याचा पवित्र पाकिस्तानकडून वारंवार घेण्यात येतो.
4सर्व प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, त्यात काश्मीरचाही समावेश असला पाहिजे, असे पाकचे म्हणणो आहे.