शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 17:41 IST

'अनेक पाश्चिमात्य देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवायचे.'

S Jaishankar :भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या म्युनिक सुरक्षा परिषदेसाठी जर्मनीत आहेत. यावेळी त्यांनी जर्मनीतील आघाडीचे वृत्तपत्र हँडल्सब्लाटला मुलाखत दिली, ज्यात भारत आणि रशियाचे संबंध, रशियाकडून तेल खरेदी करणे आणि पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानला होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर भाष्य केले आहे. 

भारत-रशियाचे संबंध स्थिर अन् मैत्रीपूर्णपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये स्थिर आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि रशियाने कधीही भारताच्या हिताला धक्का लावला नाही. कोणताही देश दुसऱ्या देशासोबत भूतकाळातील संबंधांच्या आधारावरच संबंध ठेवतो. रशियासोबतचे आमचे संबंध भूतकाळातील अनुभवांवर आधारित आहेत. रशियाने कधीही आपल्या हितसंबंधांना धक्का लावला नाही. आमचे संबंध नेहमीच स्थिर आणि मैत्रीपूर्ण राहिले आहेत.  

रशियाकडून स्वस्त तेल खरेदीरशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीवरुन अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी भारतावर टीका केली, त्यालाही जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, भारताकडे रशियाकडून तेल खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रशियन तेलावर बंदी घातली, तेव्हा श्रीमंत पाश्चिमात्य देशांनी वाढीव किमतीवर मध्यपूर्वेतील देशांकडून तेल खरेदी केले, पण भारत तसे करू शकत नाही. 

भारताला रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळाले आणि आम्ही ते विकत घेतले. मध्यपूर्व पुरवठादारांनी युरोपीय देशांना प्राधान्य दिले, कारण ते तेलासाठी जास्त किंमत द्यायचे. सर्व देशांनी मध्यपूर्वेतील देशांकडून तेल विकत घेतले असते, तर तेलाच्या किमती वाढल्या असत्या आणि त्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला असता. आम्हालाही त्या वाढीव किमतीवर तेल विकत घ्यावे लागले असते. त्यामुळेच आम्ही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केले.

पाकिस्तानला शस्त्र पुरवठाया मुलाखतीत परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करुन पाश्चिमात्य देशांनाही आरसा दाखवला. पूर्वी अनेक पाश्चिमात्य देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवायचे, पण भारताला नाही. गेल्या काही दशकांत हा ट्रेंड बदलला आहे. आम्हीही आमच्या शस्त्रास्त्र पुरवठादारांमध्ये विविधता आणली आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल हे आमचे प्रमुख पुरवठादार आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरGermanyजर्मनीAmericaअमेरिकाIndiaभारतrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानCrude Oilखनिज तेल