शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पाम ऑइल खरेदी करणार; भारताच्या बंदीनंतर पाकचा मलेशियाला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:37 IST

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात आगपाखड करणं सुरूच ठेवलं आहे.

ठळक मुद्देभारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या मलेशियाकडून आता पाकिस्तान पाम ऑइल खरेदी करणार आहे. आम्हाला शक्य होईल, तेवढं पाम ऑइल मलेशियाकडून खरेदी करू, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

क्वालालंपूर: काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात आगपाखड करणं सुरूच ठेवलं आहे. त्यानंतर भारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या मलेशियाकडून आता पाकिस्तान पाम ऑइल खरेदी करणार आहे. इम्रान खान सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर असून, आम्हाला शक्य होईल, तेवढं पाम ऑइल मलेशियाकडून खरेदी करू, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांच्यासोबत इम्रान खान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. त्या परिषदेत त्यांनी भारताकडून होत असलेलं नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या मलेशियाचे इम्रान खान यांनी आभार मानले आहेत. काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यांसारख्या अंतर्गत प्रश्नात मलेशियाच्या पंतप्रधानांना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. दुसरीकडे महातीर मोहम्मद यांनीही भारताच्या अंतर्गत विषयासंदर्भात बोलतच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मलेशियाहून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्स चिपवर भारतात तांत्रिक कारणास्तव बंदी घातली जाऊ शकते.  या चिपचा उपयोग दूरसंचार साधने तयार करण्यासाठी होतो. ''कुठे काही चुकीचं होत असल्यास बोलावं लागेल''भारतानं आमच्या आयातीवर घातलेल्या प्रतिबंधावर मी चिंतीत आहे. परंतु चुकीच्या गोष्टींसंदर्भात मी कायमच बोलत राहणार आहे. भारतानं आमच्या पाम ऑइलवर बंदी घातली आहे, त्यामुळेच आम्ही चिंतीत आहोत, कारण भारत आमचा बाजारातील मोठा ग्राहक आहे, परंतु आपल्याला या गोष्टींवर नजर ठेवावी लागणार आहे, असंही मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं आमच्या तेल आयातीवर बंदी घातल्यानं मलेशिया बाजारातही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.   

टॅग्स :Imran Khanइम्रान खान