अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई, लोकमत न्यूज नेटवर्कतेल अवीव: कृषिक्षेत्रात इस्रायलने केलेल्या प्रगतीसोबत जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करणे, सांडपाणी प्रक्रिया, सायबर सुरक्षा, जलद वाहतूक व्यवस्था (स्मार्ट मोबिलिटी), पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रातील प्रमुख इस्रायली कंपन्यांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट आणि त्यातून भारतासाठी व महाराष्ट्रासाठी कोणते लाभ मिळवता येतील याचा प्रयत्न केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल करणार आहेत.
इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योगमंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल हे २० ते २२ नोव्हेंबर अशा तीन दिवसीय दाैऱ्यासाठी येथे आले आहेत. त्यांच्यासोबत भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की), असोचेम आणि स्टार्ट-अप इंडिया यांतील (पान ११ वर)
व्यापार, तंत्रज्ञान अन् गुंतवणुकीवर इस्रायल दौऱ्यात होणार चर्चा
- इस्रायली वरिष्ठ नेत्यांसोबत गोयल हे उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतील. इस्रायलचे अर्थ आणि उद्योगमंत्री नीर बरकत यांच्या व्यतिरिक्त गोयल काही इतर मंत्र्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.
- व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, कृषी, पाणी, संरक्षण, तंत्रज्ञान, जीवशास्त्र, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे आणि स्टार्ट-अपसह दोन्ही देशांच्या व्यवसायांमध्ये वाढीव सहकार्याच्या संधी ओळखणे यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित भारत-इस्रायल मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) प्रगतीचा आढावादेखील घेतला जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Minister Piyush Goyal's Israel visit aims to boost cooperation in agriculture, water, cyber security, and infrastructure. Discussions will cover trade, technology, and investment, exploring opportunities for Indian businesses and reviewing the proposed India-Israel Free Trade Agreement.
Web Summary : मंत्री पीयूष गोयल की इजराइल यात्रा का उद्देश्य कृषि, जल, साइबर सुरक्षा और बुनियादी ढांचे में सहयोग को बढ़ावा देना है। चर्चा में व्यापार, प्रौद्योगिकी और निवेश शामिल होंगे, भारतीय व्यवसायों के लिए अवसरों की खोज की जाएगी और प्रस्तावित भारत-इजराइल मुक्त व्यापार समझौते की समीक्षा की जाएगी।