शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"भारत आपला शत्रू, तो पुढे गेला तर आपला अपमानच"; ADITYA-L1च्या यशामुळे पाकिस्तानी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 09:42 IST

भारताने नुकतेच सूर्यावर आदित्य L1 हे यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले

India vs Pakistan, Aditya L1: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या सुरक्षित लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आदित्य-एल१ चे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. मात्र, अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती आणि यश आपल्या शेजारी देश पाकिस्तानमधील काही लोकांना पसंत पडत नाही. ADITYA-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, अनेक पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात भारताच्या प्रगतीबद्दल त्यांची ईर्ष्या दिसून येत आहे. ADITYA-L1 मिशनच्या यशानंतर काही स्थानिक माध्यमांनी याबाबत पाकिस्तानी लोकांचे मत विचारले असता त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली.

ADITYA-L1 मोहिमेबाबत एका महिलेने सांगितले की, 'भारत हा आपला शत्रू आहे, ते चंद्र-सूर्याकडे जात आहेत, जर ते पुढे गेले तर तो आपला अपमान आहे.' एका पाकिस्तानी माणसाने सांगितले की, ही काही मोठी गोष्ट नाही, आपणही एक दिवस चंद्र-सूर्यापर्यंत पोहोचू.

'भारत आपल्यापेक्षा हजार वर्षे पुढे आहे'

यासाठी एका पाकिस्तानी नागरिकाने आपल्या सरकारला दोष दिला असला तरी, भारत आपल्यापेक्षा एक हजार वर्षे पुढे गेला आहे आणि आमचा काहीही सामना नाही, असे त्याने म्हटले आहे. ते शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनवतात आणि पाकिस्तान त्या शास्त्रज्ञाला माफी मागायला लावतात. मीडियाच्या प्रश्नावर आणखी एका पाकिस्तानी नागरिकाने सांगितले की, भारताने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे, आता ते अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करत आहेत, पाकिस्तान स्वत:चं मरण ओढवून घेत आहे.

'भारत-पाकिस्तानमध्ये स्पर्धा नाही'

ADITYA-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणावर, एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा असू शकत नाही, आम्ही शून्यावर उभे असताना ते 100 पावले पुढे आहेत. त्यांचा विकास दर सात टक्के आहे तर आमचा शून्य आहे. भारताच्या मदतीशिवाय पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी विचारवंत साजिद तरार यांनी ADITYA-L1 च्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन केले आणि हे भारताचे यश असल्याचे सांगितले. अमेरिकेतून पदवी घेऊन त्यांचे लोक भारतात जातात आणि पाकिस्तानातील लोक उपासमारीने देश सोडून जातात. येत्या काळात पाकिस्तानचे लोक फक्त गवतच खातील कारण तुमच्याकडे पर्याय नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १Pakistanपाकिस्तानChandrayaan-3चंद्रयान-3IndiaभारतAmericaअमेरिका