शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"भारताला कुठलीही विशेष सूट नाही"; कॅनडाच्या आरोपावर अमेरिकेने घेतली कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 12:43 IST

आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहू. आमचा जवळचा मित्र कॅनडा त्याच्या तपास आणि मुत्सद्दी प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना त्याच्यासोबतही आम्ही काम करू असं सुलिव्हन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं.

नवी दिल्ली – कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर लावलेल्या आरोपावरून आता अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्याकांडात भारताचा हात आहे असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी अमेरिकेने भारताला कुठलीही विशेष सूट मिळणार नाही असं म्हटलं आहे. कोणताही देश प्रभावित झाला तरी अमेरिका आपल्या मूलभूत तत्त्वांसाठी उभी राहील असं अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सुलिव्हन म्हणाले की, कॅनडाच्या आरोपांबद्दल अमेरिका खूप चिंतेत आहे. या आरोपाचा तपास झाला पाहिजे या मागणीला आमचे समर्थन आहे. दोषींना न्यायाच्या चौकटीत उभे केले जावे असं अमेरिकेला वाटते. त्यावर पत्रकारांनी अध्यक्ष जो बिडेन या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलतील का आणि या वादामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न सुलिव्हन यांना विचारले.

त्यावर खासगी राजनैतिक चर्चेबद्दल बोलायचे नाही परंतु अमेरिका या मुद्द्यावर उच्च पातळीवर भारतीय अधिकार्‍यांच्या संपर्कात आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. आम्ही काम करत राहू आणि कोणत्याही देशाची पर्वा न करता आम्ही ते करू. अशा कामासाठी कोणालाही कोणतीही विशेष सूट दिली जाणार नाही. देश कोणताही असो, आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहू. आमचा जवळचा मित्र कॅनडा त्याच्या तपास आणि मुत्सद्दी प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना त्याच्यासोबतही आम्ही काम करू असं सुलिव्हन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं.

कॅनडासोबत मतभेदावर काय म्हणाले अमेरिकन अधिकारी?

नुकताच एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये अमेरिका कॅनडाच्या या प्रकरणात पडण्याचे टाळत आहे. आणि त्यापासून अंतर राखतेय असं म्हटलं होते. या प्रकरणी अमेरिका भारतावर टीका करण्याचे टाळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हे वृत्त अमेरिकन अधिकारी सुलिव्हन यांनी फेटाळत 'मी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न मीडियामध्ये पाहिले आहेत. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद आहेत हे मी स्पष्टपणे नाकारतो. आम्ही आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत. तपास पुढे जावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. हा आरोप उघडकीस आल्यापासून अमेरिकेने तपास पूर्ण होईपर्यंत आपला पूर्ण पाठिंबा कायम ठेवला आहे असं अमेरिकने म्हटलं.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाAmericaअमेरिका