शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:28 IST

लंडनमध्ये सुरू असलेला ७० वर्षे जुना खटला अखेर निकाली

लंडन: निजाम फंड खटल्यात भारतानंपाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. लंडनमध्ये सुरू असलेला खटला भारतानं जिंकल्यानं आता निजामाचा खजिना भारताला मिळाला आहे. तर पाकिस्तानला दुहेरी दणका बसला आहे. पाकिस्तानच्या हातून निजमाचा खजिना निसटल्यानं त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करण्याची नामुष्की ओढावली आहे. याशिवाय हा खटला लढण्यासाठी भारतानं खर्च केलेल्या एकूण रकमेपैकी ६५ टक्के खर्चदेखील (२६ कोटी रुपये) पाकिस्तानला द्यावा लागणार आहे. निजामाच्या १ मिलियन पाऊंडवर भारतानं दावा सांगितला होता. गेल्या ७० वर्षांपासून याबद्दलचा वाद सुरू होता. सात दशकांमध्ये खजिनातल्या संपत्तीचं मूल्य ३५ मिलियन पाऊंड्सवर जाऊन पोहोचलं. लंडनमधल्या एका बँकेत ७० वर्षांपासून ही रक्कम अडकून पडली होती. आता ही रक्कम भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. निजाम फंड खटल्याचा निकाल लागल्यानंतर ३५ मिलियन पाऊंड्स (३२५ कोटी रुपये) मिळाल्याची माहिती भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासातल्या अधिकाऱ्यांनी दिली. २० सप्टेंबर १९४८ पासून ही रक्कम नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक खात्यात अडकली होती. पाकिस्ताननं या रकमेवर दावा केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयानं भारताच्या आणि मुकर्रम जाह (हैदराबादचा आठवा निजाम) यांच्या बाजूनं निकाल दिला. मुकर्रम आणि त्यांचा लहान भाऊ मुफ्फखम जाह पाकिस्तानविरोधात गेल्या ६ वर्षांपासून लंडन उच्च न्यायालयात खटला लढवत होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान