शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 2:43 PM

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला.

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याने चीनला चांगलीच मिरची झोंबली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत चीनसोबतच्या सीमावादावर बोलताना जयशंकर म्हणाले होते की, 'चीनशी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता राहणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरुन चीनसोबतचा वाद अद्याप संपलेला नाही, ते मुख्यत्वे गस्तीचे अधिकाराशी संबंधित आहेत.' यावर आता चिनी संरक्षण तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

'चीनला हे कळायला हवं...'मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले होते की, 'आज आपले चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत. याचे कारण म्हणजे सीमेवरील शांतता भंग पावली आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही, हे चीनला कळायला हवं.' या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांनी सीमा विवादावरील तोडगा केवळ भारत-चीन संबंधांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते.

चिनी तज्ज्ञांची भारताविरोधात भूमिकापरराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे रिसर्च फेलो हू झिओंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटले की, जयशंकर यांच्या टिप्पण्यांबाबत चीनने अधिक सावध राहायला हवं. जयशंकर यांनी 'राइट टू पेट्रोल'वर केलेली टिप्पणी म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. आता चीनने केवळ भारताची सामान्य चर्चाच करू नये, तर लष्करी संघर्षासाठीही तयार राहावे. जयशंकर यांनी चीनला चिथावणी देऊन सीमा आणि गस्तीच्या अधिकारांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय