India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:23 AM2020-06-22T03:23:50+5:302020-06-22T03:24:02+5:30

अमेरिकेने चीनवर भारतासह इतर शेजारी देशांसमवेत सीमेवरील तणाव वाढवल्याचा आरोप केला होता.

India China FaceOff: Talks with both countries to ease tensions - Donald Trump | India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प

India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प

Next

वॉशिंग्टन : भारत-चीन सीमेवर खूप कठीण स्थिती असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले असून, यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांशी अमेरिका बोलत आहे, असेही सांगितले आहे. ते म्हणाले की, ही खूप कठीण स्थिती आहे. आम्ही चीनसमवेत चर्चा करीत आहोत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यासमोर तेथे मोठी समस्या उभी राहिली आहे. दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. पाहू या पुढे काय होते ते. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही त्यांना मदत करीत आहोत. मागील काही दिवसांत भारत-चीन वादाबाबत अमेरिका भारताच्या बाजूने उभा असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अमेरिकेने चीनवर भारतासह इतर शेजारी देशांसमवेत सीमेवरील तणाव वाढवल्याचा आरोप केला होता.

Web Title: India China FaceOff: Talks with both countries to ease tensions - Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.