शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारताशी पंगा कॅनडाला महागात! PM ट्रुडो नरमले; म्हणाले, “आम्हाला संबंध चांगले ठेवायचेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 22:29 IST

India Canada Crisis: भारताच्या आक्रमक पावित्र्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.

India Canada Crisis:भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भारताने ट्रूडो यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत आक्रमक भूमिका मांडत आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो नरमले असल्याचे बोलले जात आहे. 

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता भारताने ट्रूडो सरकारला भारतातील आपल्या अधिकाऱ्यांना (डिप्लोमॅट) परत बोलावण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. कॅनडाने १० ऑक्टोबरपर्यंत भारतातून ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावावे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. 

आम्हाला संबंध चांगले ठेवायचेत

कॅनडाला भारतासोबतचा तणाव वाढवायचा नाही. कॅनडाला भारतासोबत चांगले ठेवायचे आहेत. कॅनडा जबाबदारीने आणि रचनात्मक संबंध कायम ठेवेल, असा असे जस्टिन ट्रुडो यांनी म्हटल्याचे वृत्त देण्यात आले आहे. दुसरीकडे, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतात कॅनडाचे ६२ डिप्लोमॅट आहेत. मोदी सरकारने ही संख्या २१ वर आणण्यास सांगितले आहे. म्हणजेच भारत सरकारने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. १० ऑक्‍टोबरनंतरही हे अधिकारी भारतातच राहिले, तर त्यांचे अधिकार काढून घेतले जातील, असे भारताने बजावले आहे. 

दरम्यान, कॅनडाचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण भारताने कॅनडाला संख्येबाबत आधीच सांगितले होते की, दोन्ही देशांतील मुत्सद्दींची उपस्थिती समान असावी. २१ सप्टेंबर रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, भारतात कॅनडाच्या अधिकाऱ्यांची संख्या, कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती कमी करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा