शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आधी आरोप, आता संबंध सुधारण्याचा प्रयत्न; कॅनडाची एस जयशंकर यांच्यासोबत सीक्रेट मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:09 IST

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

India-Canada Relation: गेल्या महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी, या हत्येत भारताची भूमिका असल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडले आहेत. आता हे संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत अमेरिकेत गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दोन्ही देशांकडून दुजोरा मिळालेला नाही.

ब्रिटीश वृत्तपत्र फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, यांच्यात ही बैठक झाली. मात्र, कॅनडा आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बैठकीला दुजोरा दिलेला नाही. कॅनडाचे सरकार भारतासोबतचे राजकीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या सांगण्यात आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाही कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते की, ते भारतासोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्हाला कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी आहे. आम्ही भारताशी खाजगीत चर्चा करू, कारण आमचा विश्वास आहे की, बंद दाराआड झालेल्या राजकीय चर्चा यशस्वी होतात.

काय आहे प्रकरण ?काही महिन्यांपूर्वी कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर, 19 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, कॅनडा दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे. आमचा निज्जरचा हत्येत सहभाग नाही, कॅनडाचे आरोप बिनबुडाचे आहेत.

 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीयS. Jaishankarएस. जयशंकर