शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत पीओकेवर कारवाई करू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 03:39 IST

इम्रान खान : लक्ष विचलित करण्यासाठी खटाटोप

इस्लामाबाद : भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) एखादी कारवाई करू शकतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. भारत देशांतर्गत मुद्द्यांवरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. झेलम जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान बोलत होते. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या लष्कराने दिल्यानंतर काही वेळातच इम्रान खान यांचे हे वक्तव्य आले आहे.

सध्या भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठी निदर्शने होत आहेत. त्यावर जगभरातून टीका होत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतातील सरकार पीओकेमध्ये एखाद्या प्रकारची कारवाई करू शकते. मागील पाच महिन्यांपासून मी या कारवाईबद्दल जगाला सांगत आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांच्याशी भारताकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत बोललो आहे. त्यावर पाकिस्तान कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. गुरुवारी भारताच्या गोळीबारात ठार झालेल्या दोन सैनिकांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.इम्रान खान म्हणाले की, नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व राष्टÑीय नागरिकत्व नोंदणीविरुद्ध (एनआरसी) भारतात राहणारे २०० दशलक्ष मुस्लिम निदर्शने करीत आहेत. पाकिस्तान मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे काहीही करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी