भारत-आॅस्ट्रेलियात सुरक्षा सहकार्य करार
By Admin | Updated: November 18, 2014 23:53 IST2014-11-18T23:53:05+5:302014-11-18T23:53:05+5:30
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रातील सुरक्षा सहकार्यासंदर्भात आराखडा तयार करण्याबाबत एकमत झाले

भारत-आॅस्ट्रेलियात सुरक्षा सहकार्य करार
कॅनबेरा : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रातील सुरक्षा सहकार्यासंदर्भात आराखडा तयार करण्याबाबत एकमत झाले असून या अंतर्गत संरक्षण, सायबर व किनारपट्टीचे संरक्षण यांचा समावेश असून दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदींनी दिली अमूल्य भेट
कॅनबेरा - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांना अत्यंत मौल्यवान अशी भेट दिली.
१८५४ साली झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे आॅस्ट्रेलियन वकील जॉन लांघ यांनी राणीच्या वतीने तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या याचिकेची फोटोप्रत मोदी यांनी अॅबॉट यांना दिली.
(वृत्तसंस्था)