शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि इस्रायलमधील प्रवासाच्या वेळेत होणार घट?, सौदी अरेबियाच्या परवानगीबद्दल चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:53 IST

एअर इंडियाच्या इस्रायलला जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इस्रायलमधील दैनिक हारेट्झने प्रसिद्ध केले आहे.

जेरुसलेम- एअर इंडियाच्या इस्रायलला जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इस्रायलमधील दैनिक हारेट्झने प्रसिद्ध केले आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सौदी अरेबियाच्या नागरी उड्डाण विभागाने स्पष्ट केल्याचेही वृत्त इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एअर इंडिया किंवा भारताचा नागरी उड्डाण विभाग यांच्यापैकीच याबाबत योग्य माहिती स्पष्ट करु शकतील.

अनेक अरब देश आणि इस्लामिक देशांनी अजूनही इस्रायलला मान्यता दिलेली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या हवाई ह्ददीमधून इस्रायलच्या विमानांना उडण्यासाठी या देशांनी परवानगी नाकारली आहे. एअर इंडियाच्या अहमदाबाद, मस्कत, सौदी अरेबिया आणि तेल अविव अशा मार्गावरील उ्डडाणास सौदी अरेबिया परवानगी देईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बोलताना दिली आहे. यामुळे इस्रायलचा प्रवास अडिच तासांनी कमी होणार असून इंधनखर्चातही घट होणार आहे.सध्या इस्रायलची विमान कंपनी एल-आल तेल अविव आणि मुंबईमध्ये विमानसेवा देते. पण हा प्रवास तांबडा समुद्र, एडनचे आखात असा करावा लागतो. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान हा मार्ग जवळचा असूनही तो या हवाई प्रवासासाठी वापरता येत नाही. त्यामुळे मुंबई आणि तेल अविव या प्रवासासाठी सात तासांचा अवधी लागतो. इस्रायलच्या पर्यटन विभागाने एअर इंडियाच्या इस्रायल हवाई उड्डाणांसाठी ७ लाख ५० हजार युरोंचा निधी जाहीर केला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यामुळे भारत-इस्रायल प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी काही फायदा होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

टॅग्स :IndiaभारतIsraelइस्रायल