शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या, या वस्तू होणार स्वस्त, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:13 IST

India-UK Free Trade Agreement: बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर आज भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्यामध्ये आज लंडन येथे झालेल्या भेटीदरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर आज भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्यामध्ये आज लंडन येथे झालेल्या भेटीदरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. तसेच रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि इंग्लंडमधील या कराराबाबत जानेवारी २०२२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळामध्ये चर्चांना सुरुवात झाली होती. तसेच २०२४ पर्यंत हा करार पूर्णत्वास नेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या या व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना गती मिळेल. तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतीत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत १२० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल.

भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामधील तरतुदींनुसार भारताला आपल्या ९९ टक्के निर्यात उत्पादनांना इंग्रंडमध्ये  करमुक्त निर्यात करता येणार आहे. तर ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ९० टक्के उत्पादनांवर वाजवी टॅरिफ लावण्यात येईल किंवा त्यावरी टॅरिफ हटवण्यात येईल. त्यामुळे भारतीय कंपन्यांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या या व्यापार करारामुळे सर्वसामान्यांनाही बऱ्यापैकी फायदा होणार आहे. या करारामुळे औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक  आणि सौंदर्य प्रसाधनांपर्यंतच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. मात्र काही वस्तू ह्या महागही होती. या करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, मरीन प्रॉडक्ट्स, स्टील आणि मेटल आणि ज्वेलरी ह्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. तर कृषि उत्पादने, कार आणि दुचाकी, तसेच स्टीलसारख्या वस्तू महाग होऊ शकतात.  

टॅग्स :IndiaभारतEnglandइंग्लंडbusinessव्यवसायInternationalआंतरराष्ट्रीय