भारत, चीन अमेरिकेच्या नोकऱ्या पळवतात, हे मी थांबवणार - डोनाल्ड ट्रम्प
By Admin | Updated: April 23, 2016 13:24 IST2016-04-23T13:24:13+5:302016-04-23T13:24:13+5:30
लहान मुलाच्या हातातून कँडी काढून घ्यावी त्याप्रमाणे अमेरिकेमधून भारत, चीन, मेक्सिको, जपान व व्हिएतनामसारखे देश नोकऱ्या काढून घेत असल्याचे सांगत

भारत, चीन अमेरिकेच्या नोकऱ्या पळवतात, हे मी थांबवणार - डोनाल्ड ट्रम्प
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 23 - लहान मुलाच्या हातातून कँडी काढून घ्यावी त्याप्रमाणे अमेरिकेमधून भारत, चीन, मेक्सिको, जपान व व्हिएतनामसारखे देश नोकऱ्या काढून घेत असल्याचे सांगत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नेत्यांवर निशाणा साधला.
माझी भारत, चीन, जपान व अन्य देशांविरोधात तक्रार नाही. भारत तर एक थोर देश आहे, परंतु अमेरिकेमधले कारकाने बंद करणारे आणि नोकऱ्या विदेशात जाऊ देणारे धोरण बदलायला हवे याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे. माझ्या क्रेडिट कार्ड कंपनीची ग्राहक सेवा कोण पुरवते हे बघण्यासाठी आपण फोन केला असता, ही सेवा भारतातून पुरवत असल्याचे आपल्याला जाणवल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आपल्याला धक्का बसला असून हे कसं काय घडू शकतं असा सवाल त्यांनी केला आहे.