अॅमेझॉनकडून पुन्हा तिरंग्याचा अपमान, स्टिकरवर छापला भारताचा चुकीचा नकाशा
By Admin | Updated: May 9, 2017 09:53 IST2017-05-09T09:44:01+5:302017-05-09T09:53:33+5:30
अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अॅमेझॉनकडून पुन्हा तिरंग्याचा अपमान, स्टिकरवर छापला भारताचा चुकीचा नकाशा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे.
शिवाय, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल चढवला आहे.
भारतीय राष्ट्रध्वज व नकाशाबाबतची चुकीची माहिती पसवणा-या अॅमेझॉनने तातडीने सर्व उत्पादने वेबसाइटवरुन काढून टाकावीत, अशी मागणी बग्गा यांनी केली आहे. वेबसाइटवर उपलब्ध असलेले वॉल डेकोरेशन स्टिकरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे, याविरधोत बग्गा यांनी आवाज उठवला आहे.