शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

बांगलादेशपाठोपाठ ब्रिटनमध्ये हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 17:01 IST

भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सध्या भारताच्या शेजारील बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी  सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील सत्ता लष्कराच्या हाती गेली. तरीही देशातील व्यवस्था मोडकळीस आली असून सर्वत्र हिंसाचार पसरला आहे. बांगलादेशात एकीकडं तणाव असताना दुसरीकडं लंडनमध्येही परिस्थिती सामान्य नाही, तिथंही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळं लंडनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने ॲडव्हायजरी म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

बांगलादेशप्रमाणं लंडनमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे. देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर येत आहेत. साऊथपोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साऊथपोर्टमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. 

बुधवारी ३१ जुलै रोजी, हजारो लोक लंडनमधील पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानाजवळ जमले आणि त्यांनी स्थलांतरितांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. आमच्या मुलांना वाचवा, आम्हाला आमचा देश परत हवा आहे आणि स्थलांतर थांबवा अशा घोषणा जमलेल्या लोकांनी दिल्या. यानंतर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. भारत सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत असून त्यांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. तसंच भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लंडनमध्ये हिंसाचार पसरल्यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी सूचना जारी करताना म्हटलं आहे की, ब्रिटनमधील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय लोकांनी ब्रिटनमध्ये रस्त्यावर फिरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तसंच, ज्या भागात आंदोलनं सुरू आहेत, त्यापासून दूर राहावं. यासोबतच भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून ब्रिटनला येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की, त्यांनी ब्रिटनला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी. 

दरम्यान, अलीकडेच ब्रिटनमध्ये  लिवरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम व मॅन्चेस्टरमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. देशात आलेले शरणार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. कित्येक दुकानांवर हल्ले झाले आहेत. अनेक दुकानं व वाहनांना आग लागवण्याचे प्रकार समोर येत आहेत. जमाव व पोलिसांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत. यात काही पोलिस व नागरिक जखमी झाले आहेत. 

बांगलादेशमध्ये मार्गदर्शक सूचना जारी बांगलादेशातील हिंसाचारामुळे सुद्धा भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२४ च्या रिपोर्टनुसार बांगलादेशात जवळपास सात हजार भारतीय राहतात. भारतानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि शेजारच्या देशात हालचाली मर्यादित करण्याचा सल्ला दिला. इमरजन्सी नंबर देखील जारी केला आहे.

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत