शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशात आता प्रत्येक ठेंबाचा हिशोब द्यावा लागणार; पाणी वापरावर कठोर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:41 IST

देशात सलग ४ वर्ष पावसाची कमतरता असल्याने यंदा दुष्काळाचं अभूतपूर्व संकट ट्यूनिशियावर कोसळले आहे

माणसाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र गंभीर दुष्काळात अडकलेल्या आफ्रिकातील उत्तरी देश ट्यूनिशियानं पाण्याच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. सरकारने एक जलयोजना प्रणाली सुरू करत कृषीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. देशात एकीकडे उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त राष्ट्राला पाण्याच्या वापरावर कठोर निर्बंध लागू केलेत. 

कार धुण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणे आणि शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर निर्बंध आहेत. अल जजीरानं सांगितले की, ट्यूनिशियाच्या नॅशनल वॉटर यूटिलिटी सोनडेनुसार, आफ्रिकी देशात ट्यूनिशिया देशात आतापर्यंत सर्वात वाईट दुष्काळाला सामोरे जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने नागरिकांना रात्री ७ तास होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री ९ ते सकाळी ४ वाजेपर्यंत पाणी बंद केले जाईल असं सोनडे म्हणाले. 

रमजानची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा अनेक लोक उशिराने उठतात. राजधानी ट्यूनिसच्या अनेक भागात रहिवाशांना रात्रीच्या वेळी पाण्याची समस्या जाणवत असल्याची तक्रार येत होती. पाणी पुरवठा योग्य होत नसल्याच्या तक्रारी लोक करत होती. तिथे आता सरकारनेच रात्रीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

देशात सलग ४ वर्ष पावसाची कमतरता असल्याने यंदा दुष्काळाचं अभूतपूर्व संकट ट्यूनिशियावर कोसळले आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून व्हावा यासाठी नागरिकांसाठी रात्री होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं पालन करावं असं सोनडे नेते मोस्बाह हलाली यांनी सांगितले आहे. त्याचसोबत जर कुणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दंड आणि जेलची शिक्षा भोगावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Waterपाणी