शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी शिवाय फेसबुक-इंस्टाग्राम चालवता येणार नाही, शहबाज सरकारचं 'फर्मान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 15:01 IST

Shahbaz Sharif Order : ...यामुळे कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक 'फरमान' जारी केले आहे. या फरमानानुसार अथवा आदेशानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

यासंदर्भात पाकिस्तान स्थापना विभाग कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. यात विद्यमान नियमांप्रमाणे, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलण्याची परवानगी नाही. तसेच, नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज अथवा माहिती अनधिकृत कर्मचारी, नागरिक अथवा प्रसारमाध्यमांसोबत शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हणण्यात आले आहे, "सरकारी कर्मचाऱ्यांना माध्यमे अथवा सोशल मीडियावर आपले मत मांडण्याचा, तसेच तथ्यांचा खुलासा करण्याचीही परवानगी नसेल. कारण  यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो." याशिवाय, सरकारची धोरणे, निर्णय आणि देशाच्या सन्मानाविरोधात भाष्य करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

...तर होऊ शकते कारवाई - सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, इतर देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम होईल. अशी विधाने करण्यावरही सरकारी कर्मचाऱ्यांना बंदी असेल. पाकिस्तान सरकारने हा आदेश सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केला आहे. याचे उल्लंघन केल्यास कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना -पाकिस्तान सरकारने सर्व सरकारी संस्थांना त्यांच्या सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर लवकरात लवकर काढून टाकण्याचे निर्देशही दिले आहेत. यासाठी सर्व संघीय सचिव, अतिरिक्त सचिव, विभाग प्रमुख आणि मुख्य सचिवांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, याचा उद्देश सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरावर बंदी घालणे नाही, असेही निवेदनावर स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानGovernmentसरकारEmployeeकर्मचारीSocial Mediaसोशल मीडिया