शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

फुटबॉल मैदानात मृत्यूचे तांडव; हरलेल्या संघाचे फॅन्स मैदानात; लाठीमार, पळापळ अन् चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 06:08 IST

फुटबॉलच्या मैदानाचे क्षणात रणांगणात रूपांतर झाले आणि चेंगराचेंगरीत १२५ जणांनी मैदानावरच प्राण सोडले. 

मलंग (इंडोनेशिया):इंडोनेशियातफुटबॉल सामन्यात झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीत १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व जावाच्या मलंग शहरात शनिवारी ही दुर्घटना घडली. फुटबॉलच्या मैदानाचे क्षणात रणांगणात रूपांतर झाले आणि अनेकांनी या मैदानावरच प्राण सोडले. 

हा सामना अरेमा एफसी आणि पर्सेबाय सुराबाय या संघादरम्यान झाला. यात पर्सेबाय सुराबाय संघाने अरेमा एफसीवर ३-२ अशी मात केली. त्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या समर्थक प्रेक्षकांनी मैदानावर येत गोंधळ सुरू केला. त्यांना हुसकाविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. एकच धावपळ सुरू झाली. लोक सैरावरा पळू लागले. अनेक जण तुडवले गेले, गुदमरले गेले. अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय पोलीस प्रमुख लिस्टयो सिगिट प्रबोवो म्हणाले की, काही मृतांची मोजणी दोनदा केली होती. मोजणी व्यवस्थित केल्यानंतर मृतांची संख्या १२५ असल्याचे स्पष्ट झाले. इंडोनेशियात २० मे ते ११ जून या काळात फिफा २०२३ वर्ल्ड कप स्पर्धा  आहे. 

पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी सांगितले की, चाहत्यांनी पोलिसांवर हल्ला केला. वाहने जाळली, त्यामुळे आम्ही अश्रुधुराचा मारा केला. ३०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अनेकांचा वाटेतच आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. १०० हून अधिक रुग्णांवर आठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.

खेळाडू आणि पोलिसांनाही मारहाण

अरेमा एफसी आणि पर्सेबाय सुराबाय या संघादरम्यान हा सामना झाला. पर्सेबाय सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात केली. अरेमा एफसी संघाच्या हजारो समर्थक प्रेक्षकांनी मैदानावर येत गोंधळ सुरू केला. त्यांनी खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर बाटल्या आणि इतर वस्तूंचा मारा सुरू केला. पाहता पाहता हा हिंसाचार स्टेडियमबाहेरही पसरला आणि पोलिसांची पाच वाहने पेटवून दिली. 

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पोलिसांनी लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी स्टँडमधील प्रेक्षकांवर थेट अश्रुधुराचा मारा सुरू केला. त्यामुळे प्रेक्षकांना बाहेरच्या दिशेने पळण्यास भाग पाडले. अश्रुधुरामुळे श्वास घेण्यास आणि दिसण्यास त्रास होऊ लागला. या गदारोळात अनेक जण खाली कोसळले आणि तुडवले गेले. यात दोन अधिकाऱ्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला. 

फिफाच्या अध्यक्षांनी स्टेडियममधील दुर्घटनेला काळा दिवस व समजण्यापलीकडची शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. तर, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सुरक्षा प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

चेंगराचेंगरीच्या  माेठ्या दुर्घटना 

३० एप्रिल २०२१ इस्रायलमध्ये माउंट मेरोन उत्सवात चेंगराचेंगरीत ४५ लोकांचा मृत्यू

२४ सप्टेंबर २०१५ सौदी अरबमध्ये हजच्या दरम्यान चेंगराचेंगरीत २,४११ यात्रेकरूंचा मृत्यू

२७ जानेवारी २०१३  ब्राझीलमध्ये एका नाइट क्लबमध्ये आग लागून चेंगराचेंगरीत २०० लोकांचा मृत्यू

२२ नोव्हेंबर २०१० कंबोडियाची राजधानी नोमपेन्हमध्ये उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ३४० जणांचा मृत्यू

३० सप्टेंबर २००८  भारतात जोधपूरमध्ये एका मंदिरात चेंगराचेंगरीत १६८ लोकांचा मृत्यू

१२ जानेवारी २००६ मक्काजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३४५ लोकांचा मृत्यू

३१ ऑगस्ट २००५ इराकच्या बगदादमध्ये धार्मिक कार्यक्रमात पुलाचे कठडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६४० लोकांचा मृत्यू

२५ जानेवारी २००५ महाराष्ट्रात मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत २६५ लोकांचा मृत्यू 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FootballफुटबॉलIndonesiaइंडोनेशिया