शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान यांना कोणत्याही क्षणी होणार अटक? निवासस्थानाला छावणीचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:17 IST

निवासस्थानाला छावणीचे स्वरूप

इस्लामाबाद : पाकिस्तानात आर्थिक संकटासह राजकीय गदारोळही वाढत चालला आहे. माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  इम्रान यांना अटक होणार असल्याचे समजल्यानंतर, समर्थकांनी लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली  आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती बिघडू नये, म्हणून पोलिसांनी घराभोवती चोख बंदोबस्त ठेवला आहे.  कोषागारातील भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून, नंतर चढ्या भावाने विकल्याचा इम्रान यांच्यावर आरोप आहे. याबाबत त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यासह त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द केले आहे. 

याचिका फेटाळलीया प्रकरणी इम्रान यांना दोन दिवसांपूर्वीच दहशतवादविरोधी न्यायालयात (एटीसी) हजर व्हायचे होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट काढले होते. याविरुद्ध इम्रान यांनी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. गुरुवारी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. 

माजी गृहमंत्र्यांना अटकपाकचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. रशीद यांच्या अटकेचा संबंध माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावरील इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोप आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान