सरकारसोबतच्या चर्चेतून इम्रान बाहेर
By Admin | Updated: August 22, 2014 01:15 IST2014-08-22T01:15:17+5:302014-08-22T01:15:17+5:30
पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकारशी होणा:या चर्चेतून गुरुवारी अंग काढून घेत शेवटर्पयत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारसोबतच्या चर्चेतून इम्रान बाहेर
इस्लामाबाद : पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकारशी होणा:या चर्चेतून गुरुवारी अंग काढून घेत शेवटर्पयत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या येथे सुरू असलेल्या निदर्शनांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय अलिप्त राहिले आहे, हे विशेष. पाकिस्तान अवामी तहरिकचे प्रमुख मौलवी ताहिरूल कादरी यांचे हजारो समर्थक इम्रान खान यांच्या या रेड झोनमधील निदर्शनांत सहभागी आहेत. रेड झोनमध्ये पार्लमेंट हाऊस, अध्यक्षांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय आदी महत्त्वाच्या शासकीय इमारती आहेत. पीएटीच्या नेत्यांनी बुधवारी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. (वृत्तसंस्था)